यावर्षी वर्धा लोकसभेचा कोण असणार खासदार..
धामणगाव रेल्वे मतदार संघातील मतदाराचा कोणाला राहील कौल.
महायुतीकडून तडस, बावनकुळे चर्चेत. तर महाविकास आघाडीकडून टोकस, कराळे यांच्या नावाची चर्चा
प्रवीण गुडधे
धामणगाव रेल्वे/प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे:- लोकसभेच्या निवडणुका काही दिवसावर आल्या असून मतदार संघात राजकीय वारे वाहत आहे, प्रत्येक गाव वस्ती वाड्यावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे .वर्धा लोकसभा मतदार संघ एकेकाळी काँग्रेस चा बालेकिल्ला समजला जायचा, 2014 पर्यंत हा मतदार संघ काँग्रेस चा गड होता वर्धा लोकसभा मतदार संघ सहा विधान सभा मतदार संघात विभागाला असून वर्धा जिल्यातील आर्वी आष्टी, देवळी पुलगाव, वर्धा, आणि हिंगणघाट असे चार विधानसभा मतदार संघ येतात, तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि मोर्शी, वरूड विधानसभा मतदार संघ असे दोन विधानसभा मतदार संघ वर्धा लोकसभेत येतात,आर्वी आष्टी, वर्धा, हिंगणघाट मतदार संघात भाजप चे आमदार असून देवळी पुलगाव मध्ये काँग्रेस आमदार आहे, विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार वर्धा लोकसभा मतदार संघात आहे,अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघा पैकी धामणगाव रेल्वे मध्ये भाजप तर मोर्शी वरूड मध्ये अपक्ष आमदार आहे,वर्धा लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाने सर्वधिक वेळा जिंकला, काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे नेते या मतदार संघातून निवडून गेले आहे, कमल नयन बजाज,प्रभा राव, माजी मंत्री वसंत साठे, दत्ता मेघे यांनी या मतदार संघाचे काँग्रेस कडून प्रतिनिधित्व केले, भाजप ला हा मतदार संघावर चार वेळा विजय मिळवता आला, विजय मुडे, सुरेश वाघमारे, आणि रामदास तडस यांच्या रूपाने भाजप ल हा मतदार संघ राखता आला, कम्युनिस्ट पार्टी ला 1991-1996 पर्यंत मारोतराव घंगारे याना सुध्दा वर्धा लोकसभा मतदार संघाच्या मतदारांनी संधी दिली होती.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रियांका गांधी यांनी वर्धा लोकसभा लढवावी अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्षा कडे केली असल्याची चर्चा आहे.
दोन पंचवार्षिक भाजप पक्ष्याचे रामदास तडस यांच्या पारड्यात मताच दान देत खासदार तडस यांना जनतेने कौल दिला. मोदी लाटेत 2014 मध्ये वर्धा मतदार संघात माझी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे विरुद्ध रामदास तडस यांच्यात थेट सामना रंगला होता, त्यात भाजप चे रामदास तडस लाखो मतांनी विजयी झाले. त्यानंतर मेघे यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस कडून चारुलता राव टोकस यांना तिकीट देऊन रिंगणात उतरवले होते तर भाजप कडून रामदास तडस आणि वंचित कडून ॲड धनराज वंजारी याना उमेदवारी मिळाली होती, मात्र काँग्रेस उमेदवार चारुलता राव टोकस याना पराभूत करत दुसऱ्यांदा रामदास तडस लोकसभेत गेले.
यावेळेस खासदार तडस यांना देवळी पुलगाव विधानसभेची तिकीट देऊन लोकसभेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वर्धा लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे तर काँग्रेस कडून चारुलता राव टोकस, आणि यू ट्यूब वर आपल्या वऱ्हाडी भाषेत शिकवणारे खदखद मास्तर नितेश कराळे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा मतदार संघात काँग्रेस दोन वेळा हरल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या नावाची सुध्दा चर्चा आहे मात्र वर्धा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी चे अस्तित्व नगण्य आहे त्यामुळे राष्ट्रवादी ला हा मतदार संघ सुटणार नाही अस राजकीय जाणकार म्हणतात.
लोकसभा मतदार संघात भाजप कडे एकूण चार विधानसभा संघावर विद्यमान आमदार आहे तर काँग्रेस कडे एक आणि अपक्ष एक असा आकडा आहे, धामणगाव रेल्वे मतदार संघात विद्यमान आमदार भाजप चे आहे त्यामळे लोकसभेला धामणगाव रेल्वे मतदार संघातील जनता कोणाला कौल देईल येणारा वेळच ठरवेल.
What's Your Reaction?








