कॅप्टन डोबाळे यांची अंतिम टप्प्यात मुसंडी !!

Nov 18, 2024 - 08:58
 0  196
कॅप्टन डोबाळे यांची अंतिम टप्प्यात मुसंडी !!
कॅप्टन डोबाळे यांची अंतिम टप्प्यात मुसंडी !!
कॅप्टन डोबाळे यांची अंतिम टप्प्यात मुसंडी !!

अकोट प्रतिनीधी ,

अकोट तेल्हारा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार सुनील डोबाळे यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. एक नवीन उमदा चेहरा म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितले जात आहे. चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आजाद यांनी तब्बल चार दिवस मतदार संघात फिरून कॅप्टन डोबाळे यांचा प्रचार केला, त्यामुळे डोबाळे यांचा पाया अधिक पक्का झाला. आझाद यांच्या तेल्हारा आणि अकोट येथील जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

काल दिवसभर दानापूर, सौंदाळा, वारखेड या परिसरात कॅप्टन डोबाळे यांचा अमित आझाद यांच्यासोबत प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी आझाद यांनी स्थानिक नेतृत्वातील उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. 

सायंकाळी आकोट शहरांमध्ये कॅप्टन डोबाळे यांनी पायी प्रचार दौरा काढून जनसामान्यांच्या भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे नंदी पेठ परिसरात सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये बोलताना कॅप्टन डोबाळे म्हणाले, परिसराचा विकास हा केवळ जाहिराती देऊन होत नसतो. त्यासाठी तळागाळातील माणसापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. समस्या निवारण करण्यासाठीच मी या निवडणुकीत उतरलो आहे. 

आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे घरोघरी जाऊन कॅप्टन डोबाळे जनसामान्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow