विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू; आर्वी परिसरात हळहळ!!
दैनिक जागर मराठी
वर्धा : आर्वी येथे २३ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून झालेला मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनिषा रुपेश महाकाळकर असे मृत तरुणीचे नाव आहे. वडनेर पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.माहितीनुसार, मनिषा ही कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. काम करताना पोटात दुखत असल्याने ती झाडाखाली विश्रांतीसाठी गेली होती. काही वेळाने काका मारोती वरभे कापसाचे गाठोडे ठेवण्यासाठी त्या दिशेने गेले असता मनिषा दिसली नाही. त्यांनी आवाज दिला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिचा शोध सुरू केला.दरम्यान, शेतातील विहिरीचे पाणी गढूळ दिसल्याने संशय निर्माण झाला. पाहणी केली असता मनिषा विहिरीत पडल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले. तिच्या पोटातील पाणी काढून तिला तातडीने हिंगणघाट येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.याप्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद हिंगणघाट पोलिसांकडे करण्यात आली होती. पुढील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर वडनेर पोलिसांनीही आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे.
What's Your Reaction?








