आस्की किड्स पब्लीक स्कूल येथे रतन टाटा जयंती उत्सव साजरा "उद्योजक सत्कार" कार्यक्रम संपन्न !!
अकोट प्रतिनिधी
आपल्या जीवनात सातत्याने घडणारी गोष्ट म्हणजे "बदल"!
या बदलासोबत जे स्वतःला बदलतात तेच यशस्वी होतात हा "निसर्गाचा नियम"!
ज्यांनी काळानुसार स्वतःला बदलले नाही त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले हा "इतिहास"!
हे शब्द आहेत प्रसिद्ध उद्योगपती आणि खंडेलवाल ज्वेलर्स चे संचालक नितीनजी खंडेलवाल आणि एम. एम. इंडस्ट्रीज चे संचालक सूनिलजी नंद यांचे.
रतन टाटा यांच्या जयंती निमित्त आस्की किड्स पब्लीक स्कूल तर्फे आयोजित "उद्योजक सत्कार" कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बदलत्या शिक्षण प्रणाली नुसार प्रत्येक व्यक्तीने स्वतःला प्रवाह अनुरूप बदलणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान पूरक जगात वावरताना प्रत्येकाला स्वतःचा रोजगार स्वतः उभा करावा लागेल. कारण इतक्या सर्व लोकसंख्येला आपले सरकार रोजगार देऊ शकत नाही. ज्यावर एकमेव उपाय म्हणजे उद्योग कौशल्य स्वतःमध्ये विकसित करून "उद्योजक" बनणे.
ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्की ग्रुप चे मिलिंदजी झाडे होते. ह्यावेळी अकोटातील प्रसिद्ध उभरते उद्योजक कृष्णा केबल अँड कंडक्टर्स चे संचालक हेमंतजी कोकाटे, प्रसिद्ध सीए तथा उद्योजक प्रशांतजी अग्रवाल आणि सामाजिक क्षेत्रात आपली विशेष छाप उमटविणारे प्रेरणा स्टोन क्रशर चे संचालक महेंद्र तरडेजा यांचा उद्योजक जगतात उल्लेखनीय कार्य आणि रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल करण्यात आला.
यावेळी उद्योजक नितीनजी खंडेलवाल यांनी स्वतःचे काही अनुभव आणि रतन टाटा यांचे जीवन परिचय मुलांसोबत वाटत मुलांना समयसूचक, अटेंटिव, कामाला न टाळणे, जे पसंत आहे.ते करणे, आताचे काम आताच, जीवनातील प्रत्येक क्षण कामात आणणे, हार्डवर्क ला स्मार्ट वर्क ची जोड देणे, निर्णय घ्या आणि त्याला योग्य सिद्ध करा. इत्यादीसाठी प्रोत्साहन देण्यात दिले. मुलांनी "एम्पलोयी" न बनता "एम्प्लॉयर" बनावे यासाठी आवश्यक पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे मार्गदर्शन उद्योजक सुनील नंद यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना मिलिंद झाडे यांनी व्यावसायिक प्रशिक्षण यावर भर देताना, मुलांना उद्योग उभारणीसाठी प्रेरित केले.
सदर कार्यक्रमाला शाळा सचिव नितीनजी झाडे, मुख्याध्यापक नेहा झाडे यांची उपस्थिती होती.
ह्या कार्यक्रमाला वर्ग ८ ते वर्ग १० वी व ज्युनिअर कॉलेजच्या च्या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन चितोडे यांनी तर संचालन वर्ग ९ चे अनिरुद्ध पंत व परी फुलारी तसेच आभार प्रदर्शन वर्ग ८ चे विद्यार्थी गौरवी धर्मे हिने केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नितीनजी झाडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण "सक्सेस मंत्रा" ची टीम गौरव कांडेलकर, नवनाथ उबाळे, मंजुषा हरणे, वैशाली कुलकर्णी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.
What's Your Reaction?








