अकोट शहरातील त्या महिलेची आत्महत्या नसून हत्या प्रियकर आरोपी अटकेत!!
दैनिक जागर मराठी
अकोट : शहरातील महेश कॉलनीत राहणाऱ्या प्रियकरांने आपल्या राहत्या घरात प्रियसीची आत्महत्या चा बनाव रचून पोलीस स्टेशन ला येऊन माझ्या घरात सदर २८ वर्षीय उच्चभ्रु कुटुंबातील महिलेने आत्महत्या केली परंतु.पोलीसाच्या व आरोपीच्या संशयास्पद वागण्यावरुन पोलीसांचा संशय वाढला व डॉक्टरांच्या रिपोर्टवरून पोलीसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सदर त्या महिलेची आत्महत्या नसून हत्या सदर महिलेचा प्रियकर अटकेत असुन सदर प्रियकराला न्यायालयाने दि.११ डिसेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.सदर गुन्हा एका दिवसात उघडकीस आणल्या बाबतीत अकोट शहर पोलिसांची जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी प्रशंसा केली.सदर गुन्ह्यांची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या बाबतीत हकीकत अशा प्रकारे आहे की, दिनांक ०७.१२.२०२५ रोजी आरोपी नामे पवन लक्ष्मण इंगळे वय २७ वर्ष रा. महेश कॉलनी अकोट जि. अकोला हा रात्री अंदाजे ०९.०० वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन ला आला व त्याने पोलीसांना माहीती दिली की, त्याचे सोबत मागील काही वर्षापासुन राहत असलेल्या महीलेने त्याचे राहते घरात गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. अशा माहीती वरून पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल माळवे पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, एएसआय अनिल वक्टे व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन सदर ठिकाणचा पंचनामा करून महीलेच्या प्रेतास पि.एम.कामी ग्रामीण रूग्णालय अकोट येथे ठेवुन सदर प्रकरणी मर्ग क्रमांक ३४/२५ कलम १९४ बिएनएसएस प्रमाणे दाखल केला.त्यानंतर काल दिनांक ०८.१२.२०२५ रोजी सदर मर्गच्या तपासा दरम्यान पवन लक्ष्मण इंगळे याने महीलेच्या केलेल्या आत्महत्येच्या बनाव अनुषंगाने पोलीसांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून तपास केला असता सदर चे प्रकरण हे पोलीसांना संशयारपद असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तसेच वैदयकिय अधिकारी, अकोट यांचे कडुन मृतक महीलेचा पि.एम रिपोर्ट प्राप्त केला असता त्यामध्ये मृतक महीलेचा गळा आवळल्याने मृत्यु झाले बाबत अभिप्राय असल्याने आरोपी पवन लक्ष्मण इंगळे यास ताब्यात घेवुन त्यास बारकाईने विचारपुस केली असता त्याने मृतक महीलेचा गळा आवळून खुन केल्याची कबुली दिली वरून सदर प्रकरणी मृतक महीलेचे भावाचे बयाणावरून अप.नं. ४८४/२५ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला व आरोपी पवन लक्ष्मण इंगळे वय २७ वर्ष रा. महेश कॉलनी अकोट जि. अकोला यास अटक करण्यात आली आहे.सदर ची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेडडी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, वैभव तायडे, एएसएस अनिल वक्टे, पोहेकॉ नंदकिशोर कुलट, नापोका विपुल सोळंके, पोकों विशाल दारोकार, चालक पोकॉ संदीप तायडे, सुरेश माकोडे यांनी केली.सदर आरोपी हा अविवाहित असुन महिला हि विवाहित असून तिचे सासंर व माहेर अकोटच आहे.सदर महिला ही २८ वर्षाची होती.त्यामुळे सदर महिला हि पवन इंगळे च्या प्रेमात पडली व शेवटी आत्महत्येचा बनाव रचून हत्या चे गुढ अकोट शहर पोलिसांनी बाहेर काढले.
What's Your Reaction?








