अंगणवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची, नालीची दुरुस्ती करा !!

Dec 20, 2025 - 15:03
 0  7
अंगणवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची, नालीची दुरुस्ती करा !!

दैनिक जागर मराठी 
विशाल येलोरे 
मोहदा : वॉर्ड क्र 2 मध्ये असलेल्या अंगणवाडी क्रमांक 6 कडे जाणाऱ्या रस्त्याची व नालीची दयनिय अवस्था झालेली आहे. त्या रस्त्यामुळे व नालीमुळे अंगणवाडी मध्ये जाणारे विध्यार्थी हे आजारी पडत आहे. त्या नालीचा दुर्गंध व रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कचऱ्याचे ढिग यामुळे रोगराई पसरत आहे. व्यवस्थित रस्ता व त्या नालीचे कोणतेही बांधकाम नसल्याले त्या नालीचे पाणी हे रस्त्यावर येत आहे, त्यामुळे तेथील पालकवर्गाना आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवावं लागतं आहे. तरी ग्रामविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन नाली व रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी व विध्यार्थीना व तेथील रहिवाश्यांना होणारा त्रास या टाळावा असे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी अजय जाधव, रंजित राठोड, गजानन राठोड, शाहू जाधव, बादल जाधव, कुणाल जाधव, अविनाश राठोड, विशाल येलोरे आदि उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow