गजानन महाराज विजय ग्रंथाची परीक्षा!!
दैनिक जागर मराठी
अमरावती : (दि. 8) श्री रामदेव बाबा भक्त परिवार, श्री गजानन महाराज अध्ययन समूह शिवनगर आणि वनमाला देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज विजय ग्रंथाची परीक्षा आयोजित करण्यात आली. लहरी बाबा मंदिर, लक्ष्मीनगर येथे पार पडलेल्या या परीक्षेला सुमारे 90 भाविकांनी सहभाग नोंदवला. 100 गुणांच्या या परीक्षेला सकाळी 11 वाजता सुरुवात होऊन दुपारी 12.30 वाजता परीक्षा संपली. परीक्षेनंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल माजी शिक्षिका वनमाला देशमुख यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
What's Your Reaction?








