शिवार बहुउद्देशीय संस्था येथे संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त अभिवादन

Feb 24, 2024 - 17:19
 0  35
शिवार बहुउद्देशीय संस्था येथे संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त अभिवादन

वर्धा/प्रतिनिधी

          जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शिवार बहुउद्देशीय संस्था कार्यालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  
 देव देवळात नाहीरे ते तर माणसात आहे तिथे शोधा!  गाडगे बाबां दरवर्षी पंढरपूरला जात असत पण त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन केले नाही. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पाहिला. भुकेल्याला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वस्त्र देणाऱ्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानभूती, वर्गविहीत जातीमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोध, कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरावर श्रद्धा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही बाबांची देवकल्पना होती. लेकरांना शिक्षण द्या असे कीर्तनाच्या माध्यमातून आवाहन करणारे महान संत गाडगेबाबा यांची जयंती शिवार बहुउद्देशीय संस्था कार्यालय येथे साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी प्रतीमेस हार पण करून अभिवादन केले. सादर कार्यक्रमात संस्थेचे सागर मिस्कीन, प्रणय देशमुख,तथा संस्थेचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow