शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन!!

Dec 16, 2025 - 16:09
 0  5

दैनिक जागर मराठी

अमरावती : अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांच्या ई-केवायसीअभावी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. गेल्या वर्षभरात 5 लाख 94 हजार 545 शेतकऱ्यांना मदतीपोटी जिल्ह्याला 556 कोटी 83 लाख रूपयांची मदत प्राप्त झाली आहे. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने बाधित 43 हजार 293 शेतकऱ्यांच्या ई-केवायसीअभावी 40 कोटी 67 लाख रूपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे मदतीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. अमरावती तालुक्यातील 4 हजार 539 शेतकऱ्यांचे 2 कोटी 79 लाख रूपये, तिवसा तालुक्यातील 2 हजार 765 शेतकऱ्यांचे 2 कोटी 64 लाख, भातकुली तालुक्यातील 4 हजार 224 शेतकऱ्यांचे 2 कोटी 47 लाख, चांदुररेल्वे तालुक्यातील 3 हजार 540 शेतकऱ्यांचे 2 कोटी 61 लाख, धामणगाव रेल्वे तालुक्यातील 3 हजार 875 शेतकऱ्यांचे 2 कोटी 69 लाख, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 3 हजार 305 शेतकऱ्यांचे 2 कोटी 83 लाख, अचलपूर तालुक्यातील 3 हजार 885 शेतकऱ्यांचे 4 कोटी 59 लाख, चांदुरबाजार तालुक्यातील 2 हजार 589 शेतकऱ्यांचे 2 कोटी 64 लाख, मोर्शी तालुक्यातील 2 हजार 23 शेतकऱ्यांचे 2 कोटी 50 लाख, वरूड तालुक्यातील 1 हजार 642 शेतकऱ्यांचे 4 कोटी 80 लाख, दर्यापूर तालुक्यातील 4 हजार 707 शेतकऱ्यांचे 3 कोटी 44 लाख, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 2 हजार 140 शेतकऱ्यांचे 2 कोटी 22 लाख, धारणी तालुक्यातील 2 हजार 866 शेतकऱ्यांचे 3 कोटी 5 लाख, चिखलदरा तालुक्यातील 1 हजार 193 शेतकऱ्यांचे 1 कोटी 34 लाख रूपये ई-केवासीअभावी प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण होत नसल्याने निधीच्या वितरणात अडचण येत आहे. जिल्हास्तरावर अंमलबजावणी समाधानकारक दिसत असली तरी ई-केवायसी करून निधी वितरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्डसह नजिकच्या आधार सेवा केंद्राला भेट देवून तातडीने ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow