अकोट | भूमी फाऊंडेशन,विदर्भ तर्फे भव्य दिव्य भूमी गरबा,दांडीया स्पर्धा !!
भूमी फाऊंडेशनचे आयोजन : बक्षिसांची लयलूट
वर्षभर राबविण्यात येणार सामाजिक उपक्रम;कु.चंचल पितांबरवाले
अकोट |अकोट शहरात भूमी फाऊंडेशन २००८ पासून विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.अकोट शहरात ६ ऑक्टोबर रोजी भव्य गरबा दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा श्री.सरस्वती विद्यालय कॉलेज रोड अकोट येथे सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार आहे,या स्पर्धेमध्ये शहरातील तसेच अंजनगाव,दर्यापूर, अमरावती,तेल्हारा महिला,युवती मोठ्या संख्येने सहभागी होतात.या स्पर्धेसाठी बक्षिसांची लयलूट करण्यात येत असून त्यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट वेशभूषा,उत्कृष्ट गट,उत्कृष्ट जोडी,उत्कृष्ट गरबा खेळाडू यासह भरपूर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत भूमी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कु.चंचल पितांबरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी उत्साहात पार पडणार आहे.अकोट अकोला शहरातील गणमान्य मंडळी या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरणासाठी हजेरी लावणार आहेत.या स्पर्धेमध्ये महिला व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन भूमी फाऊंडेशनच्या अध्यक्षा कु.चंचल पितांबरवाले यांनी केले आहे.या गरबासाठी भूमीचे सर्वश्री सदस्य अगस्ती ठाकूर,अमोल पवार,संदेश चोंडेकर,सौ.शिल्पा राठी,सौ.शुंभागी बरेठीया,सौ.मिनाक्षी आडे,सौ. रंजना इंगळे,स्मिता महल्ले,सचिन वानखडे,सुमेध खंडारे,प्रशांत बेराड,जितेश गलांडे,सविता घाटे,श्याम इंगळे,गौतम मुळे,चिराग श्रावगी,भाग्यश्री घाटे अथक परिश्रम घेत आहेत.
What's Your Reaction?








