मोठी बातमी! अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी CID करणार!!
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.अशातच आता या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एन्काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID)सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आज अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडत आणि पेडे वाटत जल्लोष साजरा केला. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा बदलापूर रेल्वे स्थानकावर पेढे वाटण्यात आले.
What's Your Reaction?








