संग्राम थोपटेंच्या कारकिर्दीला अजित दादांकडून सुरुंग !!
पुणे | विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक पक्षात हालचालींना वेग आला आहे. त्यातच भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच भोर विधानसभेमधून गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले शंकर मांडेकर यांच्यावर पक्षाने कारवाई केली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी अजित पवार गटाने शंकर मांडेकर यांना भोर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या १५ वर्षाच्या कारकिर्दीला धक्का बसणार आहे. शंकर मांडेकर यांना तिकीट मिळाल्याने भोर विधानसभा निवडणुक चुरशीची होणार आहे.
गेल्या १५ वर्षापासून आमदार संग्राम थोपटे हे भोर विधानसभेचे नेतृत्व करतात. ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र, गेल्या १५ वर्षामध्ये भोर विधानसभेमध्ये असलेल्या वेल्हा, मुळशी आणि भोर या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला पाहायला मिळाला नाही. अनेक नागरिकांना हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे अनेक जण आपले घर सोडून शहराच्या ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्यास गेले. स्थानिक नागरिकांना घर सोडून बाहेरच्या शहरातील काम करावे लागते. तीन टर्म आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांच्या काळात या तालुक्यांचा विकास झाला नसल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे शंकर मांडेकर यांना संग्राम थोपटे यांच्याविरोधात अजित पवार यांनी मैदानात उतरवले आहे.
What's Your Reaction?








