मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला,400 ते 500 शेतकरी जल समाधीसाठी जात असताना पोलीससानी अडवले
सुभाष आहेर जिल्हा प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर
*वैजापूर:-* गंगापूर वैजापूर तालुक्यात उन्हाचा तडाका व पाणी पातळी कमी झाल्याने फळबाग, जनावरे व पिण्याच्या पाण्यासाठी नांदूर- मधमेश्वर कालव्यात तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी करीत. गंगापूर व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून वैजापूर नगरपालिका कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते. पाणी न सोडल्याने 11 मे रोजी नाशिक येथील मुकणे व भाम धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता, त्यानुसार 400 ते 500 शेतकरी 11 मे रोजी जलसमाधी आंदोलनासाठी जात असताना येवला पोलिसांनी मांजरी, माहूली, मुद्देशवाडगाव, वाहेगाव, शिंदेवाडी, सिंगी, पिंपरी आदी गावातील 200 ते 300 शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून महिला व पुरुषांना ताब्यात घेऊन गंगापूर, येवला व निफाड पोलीस स्टेशनच्या आवारात बंदिस्त केले असता तेथे शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणे दिल्या. पुढे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?








