हेमंत गावंडे खुनाच्या तपासात रेल्वे व पोलीस कर्मचाऱ्याची दिरंगाई
*हेमंत गावंडे खुनाच्या तपासात रेल्वे व पोलीस कर्मचाऱ्याची दिरंगाई*
▪️पिडीत कुटुंबाला कर्मचाऱ्यांची अभद्र वागणूक
▪️हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी
अकोला ,
अकोट वरून अकोला रेल्वे प्रवासदरम्यान अकोला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर हेमंत गावंडे यांच्या पत्नीवर जबरी दरोडा टाकून मंगळसूत्र चोरीच्या घटनेत पाठलाग करणाऱ्या हेमंत गावंडे याच्यावर चोरट्याने हल्ला करून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अद्यवत ताजी असून 16 मार्च 2025 रोजी झालेल्या ह्या हत्या व जबरी दरोडा प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा तसेच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हेमंत गावंडे यांच्या पत्नी यांनी केली आहे.
हेमंत गावंडे त्यांच्या पत्नी व तीन वर्षाचा मुलगा दि.16 मार्च 2025 रोजी रेल्वे क्रमांक 77612 ने रात्री 9:30 च्या सुमारास अकोट वरून अकोला रेल्वे प्रवास करतांना चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र मोबाईल आणि पाकीट हिसकावून पळ काढला. चोरट्यांच्या मागे हेमंत गावंडे धावले असता त्यांच्यावर चोरट्याने जबर हल्ला केला. आयकॉन रुग्णालयात उपचारादरम्यान दि.18 मार्च 2025 रोजी हेमंत गावंडे यांनी अखेरचा श्वास घेतला. सदर घटनेत घटनास्थळी पोलीस प्रशासन व रेल्वे कर्मचारी यांच्या दिरंगाई व निष्काळजीपणा तसेच मानसिक त्रास दिल्याचा आरोप हेमंत गावंडे यांच्या पत्नी हर्षा गावंडे यांनी केला.बेजबाबदार कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करिता प्लॅटफॉर्म क्रमांक १,२,३,४ चे CCTV कॅमेऱ्याचे व्हिडिओ फुटेज ची मागणी सुद्धा हेमंत गावंडे यांच्या पत्नीकडून करण्यात आली असून सदर हत्या प्रकरणाचा खटला निवृत्त उच्च न्यायालय न्यायमूर्ती यांच्याकडून चौकशी करून आरोपी रवी नत्थुलाल परमार विरुद्ध खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून पिडीत कुटुंबाला आर्थिक ५० लाख रुपयाचे सहाय्य तसेच परिवारातील १ सदस्याला नोकरी देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीचे निवेदन हेमंत गावंडे यांच्या पत्नी हर्षा गावंडे ह्यांनी रेल्वे स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालयाला दि.2 एप्रिल 2025 ला सादर केले आहे.
What's Your Reaction?








