पीडित पतीच्या न्यायासाठी पोलीस स्टेशनच्या चकरा; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!!

Dec 11, 2025 - 15:06
 0  8

दैनिक जागर मराठी 

मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती स्थित मरीमाता मंदिर परिसरातील राहणारे अब्दुल अजीम अब्दुल अजीज चक्क न्याय मागण्याकरिता शहर पोलीस स्टेशनच्या चकरा मारत असल्याचे पहायला मिळत आहे. मूर्तिजापूर च्या जुनी वस्ती स्थित मरी माता मंदिर परिसरात राहणारे अब्दुल अजीम अब्दुल अजीज यांचा विवाह अकोल्याच्या गंगानगर, हमसफर मॅरेज बिरो परिसरातील एका मुलीशी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मुस्लिम समाजाच्या रितिरिवाजाने अकोला येथील जाकीर हॉल येथे विवाह पार पडला. विवाह नंतर काही दिवसांतच अब्दुल अजीम अब्दुल अजीज यांच्या पत्नी ने मूर्तिजापूर येथे न राहण्याकरिता तगदा लावत वाद सुरु केला. विवाद होऊ नये या करिता अब्दुल अजीम अब्दुल अजीज यांनी काही दिवसांकारिता आपल्या पत्नीला माहेरी पाठवले व आपल्या सासरच्यांच्या मंडळींची बोलून काही दिवसांनी परत आणण्याकरता गेले असता, पत्नी येण्यास नकार देत होती काही महिने उलटल्यानंतरही पत्नी येण्यास नकार देत असल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांकडून विचारपूस केली असता त्यांच्या पत्नीने कुठलीही माहिती न देता परस्पर दुसरे लग्न केल्याचे त्यांना माहिती मिळाली यावरून आपल्या पत्नीने आपली फसवणूक केल्याची तसेच पहिल्या पती सोबत घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा असल्याचे तक्रार देण्याकरिता मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला गेल्या २ डिसेंबर २०२५ पासून तक्रार देऊनही पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप माध्यमांसमोर अब्दुल अजीम अब्दुल अजीज यांनी व्यक्त केलाय. तर मला न्याय न मिळाल्यास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा हि त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow