पाणी बाटली ५० हजारांना, तर चहा ६५,०००, कोणतं भारतीय रेस्टॉरंट आकारतं चक्रावून टाकणारी रक्कम !!
नवी दिल्ली: जरा विचार करा, ५०,००० रुपयांना १.५ लीटर पाण्याची बाटली, ३०,००० ना एक तवा रोटी, आणि ६५,००० रुपयांना एक चहा! हे आकडे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण हे खरं आहे. अर्थात, हे बिल आपल्या भारतातल्या कोणत्या रेस्टॉरंटचे नाही, तर व्हिएतनाममधील एका भारतीय रेस्टॉरंटचे आहे. आणखी एक गोष्ट, ही किंमत भारतीय रुपयांमध्ये नाही, तर व्हिएतनामच्या 'डोंग' या चलनात आहे.
मार्च महिना भारतीय रुपयांसाठी खूप चांगला ठरला. गेल्या सात वर्षांमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत २.५% नी मजबूत झाला. २०१८ नंतर एका महिन्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. शुक्रवारी रुपया ३२ पैशांनी वधारला आणि ८५.४७ रुपये प्रति डॉलर या भावावर बंद झाला.
एक काळ असा होता, जेव्हा एक रुपयाची किंमत एका डॉलरच्या बरोबर होती. आज डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर दिसत असला तरी, जगातील अनेक देशांच्या चलनांच्या तुलनेत तो अजूनही खूप मजबूत आहे. काही देशांची चलने भारतीय रुपयांपेक्षा खूपच स्वस्त आहेत. व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये तुम्हाला रुपयाची खरी ताकद दिसेल. व्हिएतनामचे चलन सध्या जगातील दुसरे सर्वात स्वस्त चलन आहे. पहिल्या नंबरवर इराणचा रियाल आहे. चलन स्वस्त असल्यानेच अनेक भारतीय या देशाला पसंती देत आहेत.
What's Your Reaction?








