क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात खेळाडूंना क्रीडा गणवेश वाटप !!

Aug 31, 2024 - 17:07
 0  17
क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात खेळाडूंना क्रीडा गणवेश वाटप  !!

सुनिल घुमरे/नाशिक 

दिंडोरी : येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक शरद बोडके, सुभाष आव्हाड व राजेंद्र दरगोडे यांच्या हस्ते खेळाडूंना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, शिवाजी साबळे, सुनीता आव्हाड, सुनीता बागुल, पूजा उघडे, वैशाली पगारे, जना भोये, लक्ष्मण बागुल उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी दरवर्षी सहभागी होत असतात. त्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयातील संघ सलगपणे तालुकास्तरावर खो-खो व कबड्डी स्पर्धेत विजयी राहिला आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने या वर्षी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले. 

        सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक शरद बोडके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडा कौशल्य जोपासून राज्य पातळीपर्यंत भरारी घ्यावी व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे. यावेळी राजेश दरगोडे, सुभाष आव्हाड व प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.केले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गांगुर्डे यांनी केले तर आभार प्राध्यापक योगेश डंबाळे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow