पवारांपुढे रोहित पाटलांचं तुफान भाषण!
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प. गटाचे उमेदवार रोहित पाटलांसाठी शरद पवार यांनी तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. या सभेत रोहित पाटील यांनी जोरदार भाषण करत संजयकाका पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. या सभेला रा.कॉं.श.प. गटाचे प्रमुख शरद पवार, आमदार सुमन पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार अरुणा नलाड, भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते जयसिंग शेंडगे , अनिता सदरे, शंकर पाटील आदि मान्यवर उपस्ठित होते.स्व.आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प. गटाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांनी " आबा गेल्यानंतर या मतदारसंघाने आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं" असं म्हणत मतदारांचे आभार मानले,तर विकासाच्या मुद्द्यावरुन संजयकाका पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
What's Your Reaction?








