ट्रॅक चोरी करणारा अटकेत !!
दैनिक जागर मराठी
अमरावती : दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी टिना विलास चव्हाण पद- महसुल अधिकारी त्यांनी अवैद्य रित्या वाहनाचा विना रॉयल्टी ट्रक क्रमांक एमएच 40 व्हाय 3193 हा तहसील कार्यालय अमरावती येथे कादेशिर कार्यवाही करीता लावण्यात आला होता. आरोपी गजानन काळपांडे याने सदर ट्रक पार्किंग मधुन चोरुन नेला अशा फिर्यादी यांचे तक्रारी वरुन पोलीस ठाणे गाडगे नगर अमरावती शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1047/2025 कलम 303 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात गुन्हे शाखा, अमरावती शहर नी पोलीस ठाणे गाडगे नगर अमरावती शहर येथे दाखल अपराध क्रमांक 1047/2025 कलम 303 BNS चा समांतर तपास करीत असता सदर गुन्ह्यातील ट्रक हा नांदगाव पेठ हद्दीतील रिवा हॉटेल जवळील युनिवर्सल मोटर्स येथे आहे. सदर माहीती वरुन गुन्हे शाखेचे पथक तेथे गेले असता सदर ट्रक हा मिळुन आला. त्याबाबत तपास केला असता सदर ट्रक हा चालक सुनिल लक्ष्मणराव भांबुरकर याने आणल्याचे माहीती झाल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने सांगीतले की, सदर ट्रकचे मालक गजानन काळपांडे यांना सदर ट्रक तहसिल कार्यालयातुन आणण्या बाबत सांगीतले होते असे सांगीतले. ट्रक क्रमांक एमएच 40 व्हाय 3193 किमंत 18,00000/- रु व ट्रक चालक सुनिल लक्ष्मणराव भांबुरकर रा. वलगाव यास पुढील कार्यवाही करीता पोलीस ठाणे गाडगे नगर अमरावती शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई ही पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, पोलीस उपआयुक्त (परीमंडळ-01) गणेश शिंदे, उपआयुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, पोलीस उपआयुक्त (परीमंडळ-02) श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) शिवाजी बचाटे, वरीष्ठ पोलीस निराक्षक संदिप चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सह पोलीस निरीक्षक मनिष वाकोडे, पोहवा सतिष देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, पोलीस नाईक नाझीमोद्दीन सैय्यद, पोलीस रणजित गावंडे चालक अमंलदार प्रभात पोकडे आदी गुन्हे शाखा यांनी केले.
What's Your Reaction?








