आमदारकी गेली तरी चालेल' - आमदार बोरणारे.
दै.जागर मराठी
सुभाष आहेर/जिल्हा प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर/वैजापूर:- मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त आहे. त्यासाठी माजी आमदार की गेली तरी चालेल, असं व्यक्तव्य आमदार रमेश बोरणारे यांनी शनिवारी(दि२८)केले . त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात रामगिरी महाराजांचा मुद्दा छापण्याची शक्यता आहे.
काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये महंत रामगिरी महाराजांनी एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सप्ताह भेट दिल्याने विरोधक आक्रमक झाले होते. या व्हिडिओमुळे राज्यात सर्वात आधी वैजापूर शहरांमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. तसेच मुख्य चौकामध्ये मोठा जमाव जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. रामगिरी महाराजांवर राज्यात पहिला गुन्हा देखील वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. विरोधकांनी सरकार हे त्यांचे समर्थन करत असल्याची टीका केली होती. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते.
वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे यांनी वैजापूर येथील कार्यकर्त्यांचे मेळावा मध्ये टीका करताना होय मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त त्याच्यासाठी आमदारकी गेली तरी चालेल, असं वक्तव्य केले आहे. तर विरोधकावर टीका करताना मैदानात या, निवडणूक लढवा असे बोरणारे म्हणाले.
त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीत रामगिरी महाराजांचे भांडवल सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्याकडून होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाराजांवर गुन्हे दाखल करणारी मातोश्रीवर
माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी देखील विरोधकावर टीका करताना रामगिरी महाराजांवरती गुन्हे दाखल करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या मातोश्री सत्कार झाल्याचा दावा खान यांनी केला.
हिम्मत असेल तर मैदानात या मग तुम्हाला दाखवून देऊ, तसेच तुम्ही किती जातीवाद करत आहात. त्यापेक्षा जास्त जातीवाद आम्ही करू शकतो.
साबेर खान. माजी नगराध्यक्ष.
What's Your Reaction?








