कोकणात महायुतीची सरशी, ठाकरे गटाचा फक्त एका जागेवर विजय, पाहा नवीन आमदारांची संपूर्ण यादी !!

Nov 23, 2024 - 13:05
 0  84
कोकणात महायुतीची सरशी, ठाकरे गटाचा फक्त एका जागेवर विजय, पाहा नवीन आमदारांची संपूर्ण यादी !!

कोकण | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. अखेर या लढतीत महायुतीने महाविकासआघाडीचा सुपडा साफ केला आहे. महायुतीने तब्बल २२८ जागांवर आघाडी घेतली आहे. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५५ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त ४७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २१ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना १३ जागा मिळाल्या आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचा विभाग मानला जाणार कोकणात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, कोकण म्हणजे नारायण राणे अशी वाक्य कायमच राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतात. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता कोणाला साथ देणार याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत होती. अखेर कोकणातील जनतेने महायुतीच्या पारड्यात यश टाकलं आहे. कोकणातील १५ पैकी १४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर एका जागेवर ठाकरे गट विजयी झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow