राज्याला अलर्ट! मुंबईची सुरक्षा वाढवली!!

Sep 28, 2024 - 15:23
 0  44
राज्याला अलर्ट! मुंबईची सुरक्षा वाढवली!!

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने वर्तवलेल्या संभाव्य धोक्याची काळजी घेत मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात विशेषतः गर्दीच्या आणि संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली आहे. नवरात्री दुर्गापूजा, दिवाळी सण आणि येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. शहरात असणाऱ्या वाहनांच्या हालचालींवर सुद्धा पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दक्षिण मुंबईतील अल्पसंख्याक बहुल भागात पोलिसांकडून मॉक ड्रिल घेण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यांसह काही महत्त्वाची गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची संख्या वाढली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow