आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं, चांगलं सुरु असताना अजितदादांना सोबत घेतलं, भाजप नेत्याने खदखद बोलून दाखवली
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते मोहन जगताप यांनी आज (दि.29) कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानात उतरणारच असा, निर्धार बोलून दाखवला.शिवाय आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं, चांगलं सुरु असताना अजितदादांना सोबत घेतलं, असं म्हणत मोहन जगताप यांनी खदखद बोलून दाखवली. त्यामुळे आणखी एका नेत्याने अजित पवार यांना सोबत घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
बंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणारच...
मोहन जगताप म्हणाले की, आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरु असताना अजितदादाला सोबत घेतलं. त्यामुळे निष्ठावान लोकांची अडचण झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करून माजलगाव मतदारसंघात दुसऱ्यांनीच उमेदवारी मिळवली. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाच परंतु माजलगावमधून भाजपाकडून जे उभा होते त्यांचाही पराभव झाला. आता मात्र यावेळी मी माघार घेणार नाही, निवडणूक लढवणारच असल्याचे मोहन जगताप म्हणाले.
What's Your Reaction?








