धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये – नरहरी झिरवळ !!

Sep 30, 2024 - 05:46
 0  28
धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये – नरहरी झिरवळ !!

राज्यात मराठा आणि ओबीसींचा आरक्षणावरून वाद सुरू असतानाच आता आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलं आहे. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी विरोध केला आहे. धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ने जो अहवाल तयार केला आहे तो सरकार का प्रसिद्ध करत नाहीत? आणि इतर कमिटी नेमून त्यात काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासी समाजातूनच आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजतर्फे केली जात आहे. धनगर आणि धनगड, असा शब्दांचा अपभ्रंश केला जातो. त्या माध्यमातून आम्हाला आदिवासीमध्ये घेतलं पाहिजे, अशी मागणी होती. पण ते आमच्यातले नाहीतच, असं आमचं मत अशी भूमिका झिरवळ यांनी मांडली. धनगर समाजाला एसटी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका असेही त्यांनी नमूद केले.  झिरवळ यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वीही अजित पवार गटाचे नेते किरण लहामटे यांनी या मुद्यावरून आक्रमक भूमिका मांडली होती.  धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू असा थेट इशारा लहामटे यांनी दिला आहे.  जर धनगरांसाठीचा जीआर काढला, जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील अमदार आणि खासदार आक्रमक पवित्रा घेऊ ,अशी भूमिका त्यांनी मांडली. आत्तापर्यंत आदिवासांनी एवढा त्याग केला आहे, जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते थांबवू, रेल्वेचे रूळ उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow