अकोट ग्रामीण व शहर पोलिसांच्या संयुक्त कार्यवाहीतून २७ गोवंशांना जीवनदान !!

Oct 2, 2024 - 15:28
Oct 2, 2024 - 15:55
 0  192
अकोट ग्रामीण व शहर पोलिसांच्या संयुक्त कार्यवाहीतून २७ गोवंशांना जीवनदान !!
अकोट ग्रामीण व शहर पोलिसांच्या संयुक्त कार्यवाहीतून २७ गोवंशांना जीवनदान !!

अकोट प्रतिनिधी 

अकोट | ग्रामीण व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 27 गोवंशांना जीवनदान देत एकूण वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 2 ऑक्टोंबर रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोपटखेड गेटवरून एक आयशर हा भरधाव वेगाने येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अकोट ग्रामीण व शहर पोलीस स्टेशनच्या दोन टीम तयार करून तात्काळ मिळालेल्या माहितीप्रमाणे पाठविले असता पोलिसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव वेगाने व बेदकारपणे हिवरखेड रोड ला जाताना दिसले .पोलिसांच्या टीमने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता,आयशर चालकाने पोलिसांना कट मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीवाची बाजी लावत सदर वाहन हे आडगाव खुर्द तालुका अकोट येथे थांबवली असता, त्यामध्ये एकूण 27 गोवंश आढळून आले. 

सदर कारवाईत दोन आरोपीताना ताब्यात घेतले असून आयशर वाहना सह एकूण 27 गोवंश अंदाजे रक्कम 20,000,00 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचे आरोपी हे सरहांनपुर जिल्ह्याचे (उत्तर प्रदेश) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत. 

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनासह पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जूनघरे ,ए पी आय योगिता ठाकरे, पीएसआय शेख ,एएसआय लिखार, पोहेकॉ सोळंके ,पोहेकॉ सोनवणे, पोहेकॉ तोमर ,पोहेकॉ वासुदेव ठोसरे ,पोकॉ गोपाल जाधव, पोकॉ वामन मिसाळ ,पोकॉ शैलेश जाधव, पोकॉ रितेश जायभाये, पोकॉ अमोल यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow