संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांची कैद, मेधा किरीट सोमय्या दावा जिंकल्या !!

Sep 26, 2024 - 08:04
 0  121
संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांची कैद, मेधा किरीट सोमय्या दावा जिंकल्या !!

जागर मराठी/प्रतिनिधी :              

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. शिवडीच्या शहर दंडाधिकाऱ्यांनी निकाल सुनावला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. २०२२ मध्ये शौचालय घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत कोर्टात हजर होणार असून १५ दिवसांची कैद असल्याने संजय राऊत जामिनास पात्र आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow