शिंदेंवर गाणं, विमान कंपनीची बंदी ते सुप्रीम कोर्टावर टीका, वाद ओढवून घेणारा कुणाल कामरा नेमका कोण?
मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याने थेट महाराष्ट्राचे राजकारण आणि एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली, जी त्याला खूप भारी पडली आहे. त्याच्या स्टँडअप कॉमेडीने शिवसेना कार्यकर्ते इतके संतापले की त्यांनी ज्या हॉटेलमध्ये त्याचा शो आयोजित केला होता तेथे पोहोचून तोडफोड केली.
कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि वाद हे काही नवीन नाही. त्याचं दीर्घकाळापासून वादांशी संबंध आहे. यापूर्वीही अनेकवेळा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामुळे एकदा त्याच्यावर विमान कंपनीने बंदीही घातली होती.मुंबईत कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टँडअप शोनंतर एकच गोंधळ माजला. त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कवितेमुळे हा वाद निर्माण झाला. एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांना समर्थन देत आहे. तर, एकनाथ शिंदे गट मात्र अत्यंत नाराज आहे. शिवसेनेकडून कुणाल कामराला धमकीही देण्यात आली आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्याला भाड्याने घेतलेला कॉमेडियन म्हटलं आहे. कुणाल कामराने आपल्या शोदरम्यान एक कविता ऐकवली, त्यात त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर हा वाद सुरु झाला होता.
What's Your Reaction?








