'लाडकी'चा भरोसा नाय.! नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा अहेर...
जागर मराठी न्युज नेटवर्क
आगामी विधानसभा निवडणुकीच्या समोर महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना आणली. मात्र आता या योजनेवर विरोधकांसोबतच भाजप नेत्यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय.
या योजनेवर दुसरे तिसरे कुणी नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांमधल्या अनुदानाला कात्री लागल्याचं विधान गडकरींनी केलंय. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलीय.
लाडकी बहिण योजनेवरील गडकरींनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या आरोपांना आणखीनच धार आलीय. सरकारमध्ये लाडकीवरून नेमकं काय सुरू आहे हे गडकरींनाच माहित असेल त्यामुळे त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर राऊतांनीही या योजनेत गौडबंगाल असल्याचं 'हल्ला बोल' केलाय.
What's Your Reaction?








