लग्नासाठी मुलीच्या वयाची अट 12 आणि मुलाची 14 ठेवावी लागेल’, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य !!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा आणि मुलीच्या लग्नाच्या वयाबाबत भाष्य करताना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “लग्नासाठी मुलीच्या वयाची अट 12 आणि मुलाची 14 ठेवावी लागेल”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले आहेत. संबंधित वक्तव्य करताना त्यांनी एका घटनेचा किस्सा सांगितला. अजितल पवार यावेळी बारामतीकरांसोबत बोलत होते. “बारामतीकरांनो १९६७ पासून ९१ पर्यंत शरद पवार यांनी प्रतिनिधीत्व केलं. ९१ पासून तुम्ही मला आमदार म्हणून संधी दिली. मी नवखा होतो. मी बरेच शिकण्याचं प्रयत्न केला. मला राजकारणात ३४ वर्ष झाली. बारामतीत कायदा सुव्यवस्था चांगली असावी याचा माझा प्रयत्न सुरू आहे. मला अनेक लोक तक्रारी करत असतात. ड्रग्जबाबतची माहिती दिली जाते. गांज्याच्या गोष्टीही माझ्या कानावर आल्या. मोकातून सुटून आलेले लोक बापाचा चौक असल्यासारखा उभे राहतात. यांनी एरियाही वाटून घेतले. एकमेकांना प्रवेश देत नाहीत. बाहेरही काही लोक शायनिंग करत असतात. त्यातूनच परवा एक सातारा, बारामती आणि सोलापूरमधील तीन मुलं. दोघांच्या मनात आलं. एकाच्या पोटात रामपुरी चाकू खुपसला. दुसऱ्याने कोयत्याने वार केले. सीसीटीव्हीत मी पाहिलं. अशा प्रकारची अवस्था झाली आहे. बिहार यूपीत ही गोष्ट ऐकतो”, असं अजित पवार म्हणाले.“तुम्हाला कुणाचा प्रचार करायचा असेल तर मुभा आहे. तुम्हाला विचार मांडायचा अधिकार आहे. कुणालाही मते देण्याचा अधिकार नाही. आम्ही फक्त विनंती करू शकतो. मतदान कुणाला करायचे हा तुमचा अधिकार आहे. पूर्वी बाजारात माय मावल्या भाजी विकायला बसायच्या. फळ विकायच्या. तेव्हा कुणी तरी यायचं थोडी कोथंबीर घ्यायचे, मिरच्या घ्यायचे. पूर्वी असे प्रकार चालायचे मला ऐकायला आलं होतं. पण मी पोलिसांना सांगितलं मी इथला आमदार आहे. मला ही दादागिरी चालणार नाही. कोणत्याही मोठ्या बापाचा असेना. माझ्या मांडिला मांडी लावून बसणाऱ्याचा नातेवाईक असला तरी सोडू नका. माझ्या घरातला असला तरी मी खपवून घेणार नाही. कुणालाही वेड्यावाकड्या नजरेने त्रास देता कामा नये”, असं अजित पवार म्हणाले.
What's Your Reaction?








