राज्य सरकार तीच चूक करणार, पुन्हा उलटा कारभार'; शिवरायांच्या पुतळ्याबाबत शिल्पकारांचा प्रश्न!!!
अवघ्या महाराष्ट्राचा दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद झाला. अवघ्या आठ महिन्यात पुतळा कोसळल्याने सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी कडाडून टीका केली. तर तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. मात्र राज्य सरकार पुन्हा तीच चूक करणार आहे का? संतप्त सवाल शिल्पकारांनी केला आहे. शिल्पकारांनी पुतळा पूर्ण साकारण्यासाठी वर्षभराचा कालावधी मिळणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियेस प्रारंभ झाला. मात्र पुतळा साकारण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाहीर केल्याने इतकी घाई का, असा प्रश्न शिल्पकार उपस्थित करत आहेत. या शिवाय राज्य सरकारच्या कार्यपद्धतीविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘राज्य सरकार पुन्हा तीच चूक करणार आहे. पुतळ्याचे रेखाचित्र पाहून, त्यानंतर मॉडेल मागवून त्याच्या किंमतीचा विचार होणे अपेक्षित आहे. मात्र येथे उलटा कारभार सुरू आहे. आधी किंमतीचा विचार करून मग मॉडेल मागवण्यात येणार आहे,’ असा संताप शिल्पकारांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?








