टिचभर पोटासाठी दुचाकीला केले चार चाकी कुल्फी व्यवसाय करण्यासाठी प्रकाश बर्डे याने लढवली अनोखी युक्ती

Feb 28, 2024 - 17:27
Feb 28, 2024 - 17:52
 0  25
टिचभर पोटासाठी दुचाकीला केले चार चाकी  कुल्फी व्यवसाय करण्यासाठी प्रकाश बर्डे याने लढवली अनोखी युक्ती

गौरव टोळे 
दर्यापूर (प्रतिनिधी) :
             कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करावयाचा असला की सर्वप्रथम अनेक नकारात्मक विचार डोक्यात सैरवैर धावत असतात. पैसा कमावण्यासाठी मनाची मानसिकता व एकाग्रता ही क्वचितच काही माणसांमध्ये बघायला मिळत आहे. तर काही सुशिक्षित बेरोजगार नवतरुण वडिलांच्या जीवावर येशोआरामाचं जीवन जगण्यामध्ये गुंतले आहेत. यालाच एक अपवाद वगळता दर्यापूर पंचक्रोशीतील माऊली धांडे या गावातील प्रकाश बर्डे नामक व्यक्तीने आपल्या बुद्धीच्यातुऱ्याच्या जोरावर एक भन्नाट युक्ती लढवली आहे. प्रकाश बर्डे अगोदर हंगामी शेती काम करत असायचे आता शेतीचे काम आटोपल्याने त्यांनी गप न बसता दोन पैसे कमविण्यासाठीची तळमळ सुरूच ठेवली. कुल्फी विकण्याचा घरगुती व्यवसाय त्यांनी थाटला पत्नी मुले यांच्या सहकार्याने कुल्फी तयार करून गावात विकण्याच्या व्यवसायाचा श्री गणेशा केला. माल तयार झाल्यानंतर तो विक्रीसाठी कुठे न्यावा यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कुल्फी या पदार्थाला वातानुकूलित हवामान लागत असते. त्यासाठी कमी वेळात कमी श्रमात स्वतःच्या मोटरसायकलला अतिरिक्त दोन चाके लावून वातानुकूलित आईस्क्रीम ऑटो तयार केला. त्यामध्ये जवळपास 500 लिटर एवढ्या क्षमतेचा प्लास्टिक ड्रम बसवण्यात आला. त्यामध्ये बर्फाच्या सहाय्याने कुल्फी ही त्याच अवस्थेत दिवसभर टिकून राहते. स्वतःच्या दुचाकीला दोन अतिरिक्त चाके लावण्यासाठी त्यांना एकूण 40 हजार रुपये इतका खर्च आला. त्या वाहनाला सुशोभीकरणसुद्धा करण्यात आले. रात्रीच्या वेळी आकर्षक अशी विविध रंगाची लाइटिंग गाडीला लावण्यात आली जेणेकरून ग्राहक व्यवसायाकडे आकर्षित होतील. प्रकाश बर्डे यांनी तयार केलेल्या चारचाकी  कुल्फी गाडी ही परिसरात कुतूहलाचा विषय ठरली आहे. या चार चाकी गाडीच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसातच व्यवसाय भरभराटीला आला आहे. सोबतच घरातील सदस्यांनी सुद्धा मदतीचा हात प्रकाश बर्डे यांना दिला आहे. या अनोख्या शकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःच्या कल्पकतेने ही गाडी बनवली असता बेरोजगार युवक युवतींना जय महाकाल मटका कुल्फी ही गाडी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow