प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जि. प. शाळा बारडतांडा येथे स्नेहभोजन उपक्रम संपन्न.
पवन मनवर
अकोला बाजार प्रतिनिधी ,
अकोला बाजारः
केंद्रशासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात शिक्षण सप्ताह या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े
या उपक्रमा अंतर्गत समुदास सहभाग दिवस या दिवशी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मधून स्नेहभोजन उपक्रम राबविण्यात आले होते. या करीता सर्व शाळाना प्रोत्साहित करण्यात यावे तसेच सर्व शाळामधून स्नेहभोजन उपक्रमाचे अंमलबजावणी होईल या करिता क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले होते. या योजनेचे नाविन्यता आणन्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्या साठी या हेतूने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविण्याच्या हेतूने अकोला बाजार जवळील बारडतांडा या गावातील जि. प. शाळा येथे स्नेहभोजनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजक म्हणून गावातील सामाजीक कार्यकर्ते, केवल जयसिंग चव्हाण यांनी आपल्या स्वखर्चाने हा उपक्रम हाती घेऊन शाळेतील विद्याथ्यांना स्नेहभोजन देऊन हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष जितेंद्र जाधव, सरपंच अनिल आडे, मुख्याध्यापिका- शिल्पा देशपांडे मॅडम, व तसेच शिक्षक वर्ग ,गुणवंत शिंदे,सीमा मुजमुले,प्राची भोयर, पंकज आडे सर यांनी सहकार्य केले.व गावातील नागरीक, निखिल जाधव, संदीप ठाकरे, स्वप्नील चव्हाण ,गौरव जगताप भारत मिश्रा ,अर्जुन राठोड सुजल कोराणे यांनी कवलसिंग चव्हाण यांना सहकार्य करून आभार मानले.
What's Your Reaction?








