शासकीय आश्रम शाळा जारीदा येथे मोठया उत्सावात जागतिक आदीवाशी दिन साजरा , आदीवाशी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !!
चिखलदरा,
प्रतिनिधी, प्रशांत पंडोले
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील एकात्मिक आदीवाशी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येणारी शासकीय आश्रम शाळा जारीदा येथे मोठया उत्सावात जागतिक आदीवाशी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. एस.कान्हेकर मुख्याध्यापक,प्रमुख पाहुणे सुरेश धिकार सरपंच,हरीराम बेठेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळींनी फोटोपूजन व हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित मान्यवर मंडळींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन व मधुर स्वागत गीत गाऊन स्वागत केले.जागतिक आदीवाशी दिनानिमित्ताने आदीवाशी मुलांनी रुढि,परंपरा,संस्कृती बद्धल आपले मत व्यक्त केले.शासकीय आश्रम शाळा जारीदा येथे आदीवाशी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .आदीवाशी पारंपरिक वेषभुसा परिधान करून आदीवाशी मुलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला व उत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या संस्कृतीला उजाळा दिला. मुलांनी कलेचा माध्यमातून आदीवाशी थोर समाजसुधारक यांनी केलेल्या कार्याबद्धल माहिती दिली.उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवर मंडळींना मार्गदर्शन करतांना डी. एस. कान्हेकर मुख्याध्यापक यांनी सांगितले की,जागतिक आदीवाशी दिवस संपूर्ण जगात मोठया आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो.आदीवाशी थोर समाजसुधारकांनी केलेल्या कार्याचा आढावा व आदीवाशी संस्कृतीशी नाळ जुडलेल्या अश्या सर्व महान कार्य करणाऱ्या आदीवाशी क्रांतीकारी यांच्या कार्याची माहिती आदीवाशी दिनानिमित्ताने दिली जाते .विदयार्थी जीवनात व्यसनापासून दूर होऊन,शिक्षणाशी आपली कास धरा,शिक्षण घ्या.व्यसनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन खराब झाले आहे.परंतु ज्याने शिक्षणाशी आपले नाते जोडले तो आपल्या जीवनात यशस्वी झाला. आज जागतिक आदीवाशी दिनानिमित्ताने सर्व मुलांनी एक संकल्प करा की,आज पासून माझ्या अंगी असलेल्या अवगुणांना मी बाजूला करून माझ्या आयुष्यात चांगले गुण आणणार आणि आजपासून मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही.असे वचन प्रत्येक मुलांनी आज घेतले पाहिजे. असे मार्गदर्शनात आपले मत व्यक्त केले. राजू अखंडे उपसरपंच,सखाराम धिकार,शंकर धिकार,जे.बी.ठाकरे सर,चर्जन सर,जांबोळे सर,सावरकर सर,व गावकरी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाकरे सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.
What's Your Reaction?








