Sam Altman : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ऑली'? जाणून घ्या

Jan 12, 2024 - 09:26
 0  30
Sam Altman : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ऑली'? जाणून घ्या

Sam Altman Marriage : ओपन एआयचे (OpenAI) संस्थापक सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांचा मित्र आणि समलैंगिक प्रियकर ऑलिव्हर मुल्हेरिन (Oliver Mulherin) याच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. सॅम अल्टमन आणि ऑली यांचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत खाजगीरित्या पार पडला. बुधवारी हवाईमध्ये हा लग्न समारंभ झाला. लग्नादरम्यान दोघेही व्हाईट कलर थीममध्ये दिसले. दोघांनीही पांढरा शर्ट, फिकट बेज पॅन्ट आणि पांढरे स्नीकर्स घातले होते.

सॅम अल्टमन अडकला विवाहबंधनात

लग्नासाठी कुटुंबातील सदस्यांसह काही जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी, लॅटिसचे संस्थापक आणि सॅम यांचा भाऊ जॅक अल्टमन उपस्थित होते. तांत्रिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सॅम अल्टमन आणि ऑलीला लग्नाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोसची पार्टनर लॉरेन सांचेझ, अलेक्झांडर वांग, शेरविन पिशेवर, जेन मातोशी आणि एड्रियन औन यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

गेल्या वर्षी केली होती नात्याची घोषणा

सॅम अल्टमॅन यांनी गेल्या वर्षी मित्र आणि समलैंगिक पार्टनर ऑलिव्हरसोबत जगाला त्यांच्या प्रेमाच्या नात्याची माहिती दिली होती. एका न्यूज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सॅम अल्टमॅन यांनी सांगितलं होतं की, ते आणि ऑली सॅन फ्रान्सिस्कोमधील रशियन हिलवर एकत्र राहतात.

कोण आहे ऑलिव्हर मुल्हेरिन?

सॅम ऑल्टमनचा जोडीदार ऑलिव्हर मुल्हेरिन यांना ऑली म्हणूनही ओळखलं जातं. सॅम आणि ऑली यांची मैत्री खूप जुनी आहे. ऑलिव्हर मुल्हेरिनने मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतलं आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) क्षेत्रात त्यांनी विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. याव्यतिरिक्त, ऑलिव्हरने विद्यापीठात असताना वेगवेगळ्या एआय प्रकल्पांवर काम केलं आहे.

व्हाईट हाऊसच्या डिनर पार्टीत दिसले एकत्र

सॅम ऑल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन यांची मैत्री खूप जुनी आहे. पण, दोघेही सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळा एकत्र दिसले आहेत. गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये पीएम मोदींच्या स्वागतासाठी आयोजित डिनरमध्ये दोघे एकत्र दिसले होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow