आमदारकीसाठी मोर्चेबांधणी; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची लवकरच वर्णी, ही नावे आघाडीवर !!

Sep 23, 2024 - 04:10
 0  29
आमदारकीसाठी मोर्चेबांधणी; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची लवकरच वर्णी, ही नावे आघाडीवर  !!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर आपल्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावायला सुरुवात केली आहे. आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादीही लवकरच राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याचे खात्रिलायकरीत्या समजते. यामध्ये भाजपच्या सहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांचा समावेश असेल.राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारने आमदारांची यादी निश्चित करून ती तत्कालीन राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. राज्यात जुलै २०२२मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी आपोआपच निकाली निघाली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow