आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! युवासेनेचा सिनेटमध्ये गुलाल, ठाकरे गटाने डिवचलं!!

Sep 28, 2024 - 04:14
 0  60
आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! युवासेनेचा सिनेटमध्ये गुलाल, ठाकरे गटाने डिवचलं!!

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत युवासेनेने दहापैकी दहा जागांवर विजय मिळवत अभाविपला क्लीन स्वीप दिला. यानंतर युवासेनेसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला. 'अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही!' असं म्हणत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपला टोला लगावला.अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यांनो.. अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! आता करत बसा.. 'नरेटिव्ह.. नरेटिव्ह..'" असं ट्वीट अंबादास दानवे यांनी 'एक्स' सोशल मीडियावर केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेला मिळालेला विजय मोठा मानला जातो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow