अजितदादांचा कंठ दाटून आला, अश्रू अनावर झाले; पक्ष सोबतच कुटुंबात पडलेल्या फुटी बाबत केले जाहीर भाष्य !!
बारामती| माझी मागे चूक झाली. परंतु आता कोणी चूक केली. पहिल्यांदा फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सर्व तात्या साहेबांचे कुटुंब. बिकट परिस्थिती मधून आम्ही परिस्थिती चांगली केली. आईने सांगितले होते माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कोणी भरायला सांगितला, असे विचारले तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला. म्हणजे साहेबांनी तात्या साहेबांचे कुटुंब फोडले का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसे आहोत. एकोपा टिकवायला पिढ्यान पिढ्या जातात. परंतु तो तोडायला वेळ लागत नाही, असे सांगतात भर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.
कण्हेरी येथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी ( ता. २८) आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मोठी शक्ती प्रदर्शन करत अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पार पडलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
सभेमध्ये अजित पवार यांनी आपले कुटुंब साहेबांनी फोडले का असा सवाल करत आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत असेही सांगितले. यावेळी अजित पवार यांचा कंठ दाटून आला होता. काही काळ अजित पवार यांनी आपले भाषण थांबवले. यावेळी उपस्थित महिलांपैकी एका महिलेने उभे राहत दादा रडायचं नाही तुम्ही लढायचं आम्ही बहिणी तुमच्या सोबत आहोत,अशी आरोळी ठोकली.
What's Your Reaction?








