RCBW vs DCW | स्मृती मंधानाची झंझावाती खेळी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीवर 25 धावांनी विजय

Feb 29, 2024 - 17:56
 0  31
RCBW vs DCW | स्मृती मंधानाची झंझावाती खेळी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीवर 25 धावांनी विजय

बंगळुरु | वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स टीमने विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स टीमची विजयी घोडदौड थांबवली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने आरसीबीला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 195 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानचा पाठलाग करताना कॅप्टन स्मृती मंधाना हीने तडाखेदार खेळी केली. मात्र इतरांनी सपशेल निराशा केली. त्यामुळे दिल्लीचा विजय झाला. आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 169 धावाच करता आल्या. आरसीबीचा यंदाच्या पर्वातील हा पहिला पराभव ठरला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow