Kalki 2898 AD New Release Date : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'ची रिलीज डेट जाहीर! 'सालार'नंतर पुन्हा गाजवणार बॉक्स ऑफिस

Jan 12, 2024 - 14:37
 0  26
Kalki 2898 AD New Release Date : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'ची रिलीज डेट जाहीर! 'सालार'नंतर पुन्हा गाजवणार बॉक्स ऑफिस

Prabhas Kalki 2898 AD to Release on this Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या 'सालार' (Salaar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. या सिनेमानंतर प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.

सुपरस्टार प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. आधी हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'कल्कि 2898 एडी' कधी रिलीज होणार? (Kalki 2898 Ad New Release Date)

'कल्कि 2898 एडी' या सिनेमाची नवी रिलीज डेट आता समोर आली आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा सिनेमा 9 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि कलम हासनदेखील या सिनेमाचा भाग असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिनेप्रेमी आणि प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता सिनेमाच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रभासने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 'कल्कि 2898 एडी' 9 मे 2024 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होईल".

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow