Nawazuddin Siddiqui : सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचा अपघात; मोठी लाट आली अन् थोडक्यात बचावला अभिनेता
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. पण या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीलंकेत नवाजुद्दीनचा अपघात झाला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला होता.
नवाजुद्दीन सिद्दीकी 'सैंधव' (Saindhav) या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करत आहे. शैलेश कोलानुने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 13 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात नवाज खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी त्याने खास तेलुगू भाषा शिकली आहे. या सिनेमासाठी तो खूप उत्सुक आहे.
मोठी लाट आली अन् थोडक्यात बचावला नवाज
'सैंधव' (Saindhav) सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) म्हणाले,"श्रीलंकेत 'सैंधव'च्या शूटिंगदरम्यान मी थोडक्यात बचावलो आहे. या सिनेमाचं आम्ही समुद्रात शूटिंग करत होतो. त्यावेळी एक मोठी लाट आली आणि मी जहाजात पडलो. समुद्रात पडण्यापासून थोडक्यात बचावलो. महत्त्वाची बात म्हणजे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल".
What's Your Reaction?