PM पदाची ऑफर देणारा 'तो' नेता कोण? उद्धव ठाकरे की शरद पवार? गडकरी म्हणतात...

Sep 27, 2024 - 04:28
Sep 27, 2024 - 04:31
 0  56
PM पदाची ऑफर देणारा 'तो' नेता कोण? उद्धव ठाकरे की शरद पवार? गडकरी म्हणतात...

लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातील बड्या नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. पण विचारधारेमुळे मी ती नाकारली, असा गौप्यस्फोट करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एकच खळबळ उडवून दिली. गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देणारा तो नेता कोण, असा प्रश्न अनेकांना पडला. गडकरींना एका कार्यक्रमात याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फार काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ते काहीसे नाराज होतानादेखील दिसले.विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती. पण वैचारिक कारणांमुळे मी ती ऑफर नाकारली, असं गडकरींनी नागपुरातील एका कार्यक्रमात म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला. त्यानंतर विरोधकांनी पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता, असं गडकरी म्हणाले होते. माझी विचारसरणी वेगळी असल्यानं तो प्रस्ताव स्वीकारला नाही, असं गडकरी म्हणाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow