Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक विक्रमाची नोंद, शून्यावर बाद झाल्यावरही हिटमॅनचं 'शतक' पूर्ण

Jan 12, 2024 - 08:54
 0  23
Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक विक्रमाची नोंद, शून्यावर बाद झाल्यावरही हिटमॅनचं 'शतक' पूर्ण

मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 (T20 Saries) सामन्यामध्ये भारताने अफगाणिस्तानचा (India va Afghanistan) 6 विकेट्सने पराभव केला. भारत आणि अफगाणिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा खाते न उघडताच धावबाद झाला. शुभमन गिल आणि रोहित यांच्यात झालेल्या गोंधळामुळे टीम इंडियाला ही विकेट गमवावी लागली. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, पण त्याने टी20 मध्ये खास शतक पूर्ण केलं आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक विक्रमाची नोंद

रोहित शर्मा 14 महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर टी-20 संघात पुनरागमन करत असताना सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रमही नोंदवला गेला आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने असा विक्रम केला नाही. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला खेळाडू आहे.

रोहित शर्माचं खास 'शतक' पूर्ण

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शून्यावर धावबाद झाला, पण तरीही रोहित शर्माने खास शतक पूर्ण केलं आहे. रोहित शर्मा 100 व्या टी-20 मध्ये भारतीय संघाचा भाग होता, ज्यामध्ये संघ विजयी झाला होता. अशा प्रकारे रोहित शर्माने 100 टी-20 सामन्यामध्ये संघाचा भाग असण्याचं खास शतक पूर्ण केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow