53 तलाठ्याचे प्रशिक्षण गाव पातळीवर सुसंवाद राखून काम करा लोकांशी चांगले वागा कामे वेळेत करा!! नियुक्ती तलाठ्यांचे प्रशिक्षण विश्वस्त म्हणून काम करा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी..
सुभाष आहेर जिल्हा प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर:- तलाठी हा महसूल यंत्रणेचा गाव पातळीवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असून महसूल प्रशासनाचा पाया आहे. त्यामुळे आपण विश्वास म्हणून काम करावे अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नवनियुक्त तलाठ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा प्रशासनात नव्याने रुजू झालेल्या 53 तलाठ्यांचे दिनांक 08/06/ 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी व जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, विभागीय आयुक्त कार्यालयातील एम. के. पाटील यांनी या नवनियुक्त तलाठ्यांना मार्गदर्शन केले.
निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी उपस्थितीत शासकीय सेवेचे महत्त्व, गाव पातळीवर काम करताना पार पाडवायची जबाबदारी बाबत माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी दुसाने यांनी सद्यस्थितीतील प्रशासन या विषयावर मार्गदर्शन केले. गाव पातळीवर काम करताना सुसंवाद राखून काम करावे, असे त्यांनी सांगितले. एम. के. पाटील यांनी महसूल विभागातील तलाठी कार्यालयातील विविध नोंदी दाखले त्यांचे नियम व तस संबंधित माहिती दिली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आपण आपले काम करताना नेहमी सकारात्मक भावनेने काम करा. आपला एक निर्णय लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. लोकांशी चांगले वागा. आपण लोकसेवक आहोत.
त्या दृष्टीने त्यांच्याशी संवाद ठेवा. लोकांची शंका समाधान केल्याने प्रशासनाची प्रतिमा चांगली होते.
लोकांची कामे वेळेच्या वेळी झाली पाहिजेत या दृष्टीने आपले कामाचे नियोजन करा, अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?








