1..2..3..4..! कसोटीच्या एका डावात भारताने रचले इतके विक्रम !!

Sep 30, 2024 - 12:24
 0  22
1..2..3..4..! कसोटीच्या एका डावात भारताने रचले इतके विक्रम !!

कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. भारताने 9 गडी गमवत 285 धावांवर डाव घोषित केला. यावेळी भारताकडे 52 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकांत या 285 धावा केल्या. यासह विक्रमांची रांग लावली आहेकसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 षटकात 50 धावा करणारी पहिली टीम ठरली आहे. इतकंच काय तर कसोटीत 10.1 षटकात 100 धावांचा पल्ला गाठण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावाव होता. हा विक्रम होत नाही तोच कसोटीत 24.2 षटकात 200 धावा करणारा पहिला संघ म्हणून मान मिळवला.यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप दाखवलं होतं. या जोडीने कसोटीत 19 चेंडूत 50 धावांची सर्वात वेगवान भागीदारी केली आहे. यावेळी यशस्वी जयस्वालने 13 चेंडूत 30, तर रोहित शर्माने 6 चेंडूत 19 धावा केल्या. तर एक धाव नो बॉलच्या रुपाने मिळाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow