३०० रुपयांचा चेक, हे फक्त भाजपाच करू शकतं’, योगी सरकार संस्कृत शिष्यवृत्ती योजनेवरून ट्रोल !!

Oct 28, 2024 - 09:45
 0  43
३०० रुपयांचा चेक, हे फक्त भाजपाच करू शकतं’, योगी सरकार संस्कृत शिष्यवृत्ती योजनेवरून ट्रोल !!

उत्तर प्रदेशचे | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संस्कृत भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी एका शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशतील संस्कृतच्या सर्व विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या घोषणेनंतर शिष्यवृत्ती वाटपाचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पार पडला आहे. तसेच राज्यभरात गुरुकुल पद्धतीच्या निवासी संस्कृत शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. योगी आदित्यनाथ यांनी संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्याबाबत आवाहन करत विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा गांभीर्याने अंगिकारण्यास सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशाथील ६९ हजार १९५ संस्कृत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा शुभारंभ योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रविवारी (२७ ऑक्टोबर) संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसी येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते संस्कृत शिष्यवृत्ती योजनेचे काही चेक (धनादेश) काही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. मात्र, यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow