सेलूमध्ये बिबट्याची कातडी जप्त; महिले सहित तीन जणांना अटक!!
दैनिक जागर मराठी
सेलू : वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारे एक गंभीर प्रकरण सोमवारी (दि. ९) उशिरा संध्याकाळी सेलू शहरात उघडकीस आले. बिबट्याची कातडी विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. एका महिलेसह दोन पुरुषांकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. ही करावी हिंगणी वनपरिक्षेत्र कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
What's Your Reaction?








