शरद पवारांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मराठा आरक्षणावर भाष्य !!

Sep 30, 2024 - 12:15
 0  33
शरद पवारांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मराठा आरक्षणावर भाष्य !!

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये बोलताना शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. जरांगेंची मागणी योग्य आहे. त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर जळगावमध्ये बोलताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी रत्नागिरीच्या सभेत प्रत्यक्षपणे सांगितलं की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे असं स्पष्ट सभेत त्यांनी सांगितलं. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला. ओबीसी आणि मराठा समाजात आता दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी समाज आरक्षण विरोधी तर मराठा समाज आरक्षणाच्या बाजूने झाला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे. असं म्हणत पाठिंबा शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेत दिला. याबाबत वंचितची भूमिका अशी आहे की, ओबीसींचं आरक्षण हे त्यांचं त्यांना राहिलं पाहिजे. मराठा समजाला वेगळं आरक्षण द्यावं. आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा होत चालला आहे. सामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत. ते प्रश्न कुठेतरी मागे पडत आहेत. अशी परिस्थिती आगामी निवडणुकीची आहे. आघाड्यांचं राजकारण सुरू राहील. पण एका मुद्यावरती सर्व पक्ष कॉमन आहेत. ते म्हणजे आरक्षण कायमच संपलं पाहिजे या मुद्द्यावर हे सगळे एक आहेत मात्र वंचित आघाडी ही रस्त्यावर उतरून आरक्षण वाचविण्याचे धोरण घेईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow