विकासकामांच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी सदैव तत्पर - आ. सुलभा खोडके!!
दैनिक जागर मराठी
मारोती सोनवणे
अमरावती : प्रभागा प्रभागातील नाली बांधकाम, रस्ते डांबरीकरण, रस्ते बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी पर्याप्त निधीची तरतूद करीत तसेच नागरी वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. त्याकरिता आवश्यक ते व्यवस्थापन, नियोजन करण्यासह नागरिकांना अभिप्रेत असलेला विकास कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. तसेच खुली जिम, अंतर्गत रस्ते, नियमितपणे साफसफाई व परिसरातील स्वच्छता, अखंडितपणे पाणी पुरवठा, वीज उपलब्धी आदींसह अनेक विकासकामांची उपलब्धता करण्यासाठी व ही प्रक्रिया निरंतरपणे सुरु ठेवण्याकरिता आपणा सर्वांची चैतन्य व उर्जादायी सातत्यपूर्ण साथ तेवढीच मोलाची ठरू पाहत आहे. विकासकामांचे चक्र गतिमान ठेवण्याकरिता जनशीर्वादाचा हा जिव्हाळा सदोदित पणे माझ्यासोबत असल्याने आगामी काळात उर्वरित कामे सुद्धा मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन आ. सुलभा संजय खोडके यांनी केले. अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ शेगाव-रहाटगाव अंतर्गत पायाभूत सुविधांच्या जवळपास १ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आ. सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत विद्या वैभव कॉलनीमध्ये श्री तुळजा भवानी मंदिरास सभा मंडप व मंदिराच्या खुल्या जागेस कंपाऊंड करणे. केवल कॉलनी नं. १ येथील अँड. हरिष निंबाळकर यांचा घरासमोरील मनपाच्या ओपन स्पेस मध्ये चेनलिंग फेंसिंग करणे, केवल कॉलनी येथील मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे, साई प्रेरणा रेसिडेन्सी ते वृंदावन कॉलनी डीपी पर्यंत रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे. अशी विकास कामे करण्यात येत आहे. यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनची औपचारिकता साधली. पुढे बोलतांना आ. सुलभा खोडके म्हणाल्या कि, शहरी विकासाच्या प्रवाहात नागरिक केंद्रित धोरण आणि जनसामान्यांच्या अपेक्षांचा मागोवा घेणारा स्वच्छ कारभार आणि पारदर्शकरित्या राबविण्यासाठी विकास कार्यक्रमांची सातत्यपूर्ण मालिका राबविल्या जात आहे. शहरातील निवासी क्षेत्र, दाट लोकवस्ती, नवनवीन वसाहतींमध्ये तसेच विकासकामांचे पूर्ततेपासून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या भागाला आमदार महोदयांच्या वतीने सर्वोतोपरी प्राधान्य दिले जात आहे. मागील सहा वर्षांपासून आपण सर्वांना विकासाचा झंझावात पहावयास मिळत असून अमरावतीच्या वैभवात व लौकीकात भर पडली आहे. आगामी काळातही विकास पर्व अबाधित राहण्यासाठी आपली समर्थपणे साथ महत्वाची असून पाठबळ देण्याचे आवाहन सुद्धा आ. सुलभाताई खोडके यांनी केले.या दरम्यान जागोजागी विकासकामांचे नामफलकाचे अनावरण करण्यासह त्यांनी नागरिकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या स्वागताचा पण स्वीकार केला. तसेच विविध धार्मिक मंदिर स्थळी भेट देऊन आमदार महोदयांनी विश्वकल्याणाची मनोकामना केली. प्रभागात विकास कामाची पूर्तता झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आ. सुलभा खोडके व यश खोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. सुलभा खोडके यांच्या समवेत यश खोडके, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, रत्नदीप बागडे, अभिलाष नरोडे, प्रवीण मेश्राम, अभिषेक देशमुख, अभिमन्यू तायवाडे, अविनाश होले, सुनील धर्माळे, विद्या वैभव कॉलनी, केवल कॉलनी, साई प्रेरणा रेसिडेन्सी, वृंदावन कॉलनी येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
What's Your Reaction?








