वंचित बहुजन आघाडीचे सार्वजनिक बांधकाम उपविभागला निवेदन

Sep 22, 2024 - 10:27
 0  34
वंचित बहुजन आघाडीचे सार्वजनिक बांधकाम उपविभागला निवेदन

तेल्हारा प्रतिनिधी 

तेल्हारा तालुका शहर वंचित बहुजन आघाडी व युवक आघाडीच्या संयुक्त विद्यमाने दि.२० सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेल्हाराचे कनिष्ठ अभियंता यांना एक निवेदन सादर करून मौजे पाथर्डीच्या पुलावर कठडे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे 

गेल्या १९ सप्टेंबर रोजी जस्त गाव तालुका तेल्हारा येथील रहिवासी संदीप भिवटे हे अकोट वरून येत असताना पाथर्डी नदीच्या पुलावर रानडुकराने टक्कर दिल्याने ते २५ ते ३० फुटावरून नदीपात्रात पडलेमुळे त्यांना दुखापत झाली. सदर पुलावरून पडल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत भविष्यातही धोका संभवतो तसेच जस्तगाव फाट्यावरील चौफुलीवर गतिरोधक नसल्यान दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याची बाब निवेदनातून स्पष्ट करण्यात आली आहे. तेल्हारा ते वनीवरुळ रोडने ठेकेदाराने सुकलेल्या झाडांची लागवड करून शासनाच्या पैशाच्या आरोप निवेदनात केला आहे. या प्रकरणी तात्काळ दाखल घेऊन चांगला प्रतीचे वृक्ष लागवड करण्यात यावी पाथर्डी नदीच्या पुलावर कठळे बसविण्यात यावे व जस्तगाव फाट्यावर गतिरोधक टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या बाबीची तात्काळ दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीचे वतीने तीर्व आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिया अहमद शहा, संदीप गवई, अविनाश शिरसाट, अंकुश वाघमारे, नितीन वानखडे, राहुल घंगाळ, अनंता इंगळे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow