नाट्यकलेतून सावित्री फुले विचारांची जनजागृती!!

Dec 10, 2025 - 12:28
 0  7
नाट्यकलेतून सावित्री फुले विचारांची जनजागृती!!

दैनिक जागर मराठी  

वरुड: आपल्या अप्रतिम अभिनय कलेद्वारे गेल्या एक दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो प्रयोगाद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील मूळ निवासी कु यशश्री अशोकराव काशीकर ( सौ यशश्री अभिषेक रोटे, पूणे) यांना दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाच्या वतीने               " महाराष्ट्र सावित्री " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . पद्म भूषण डॉ विजय भटकर यांच्या गौरवार्थ करजगांव ता .  चांदूरबाजार येथे नुकत्याच संपन्न झालेल्या " मामाच्या गावाला जाऊया " या वैशिष्टपूर्ण संकल्पना कार्यक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी समारंभ सोहळा मंचावर कार्यक्रमाचे तथा श्री शंकरराव शिक्षण संस्था करजगांव संस्थेचे अध्यक्ष संदीपपंत सोनार, विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ महेंद्रजी ढोरे , श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकरिणी सदस्य हेमंतराव काळमेघ , विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य भैय्यासाहेब मेटकर, प्रा. दिपाली दिलीपजी मालखेडे ( पूणे ) यांची प्रमुख उपस्थिती होती .  यशश्री काशीकर यांनी शालेय जीवनापासून ते आजवर हे कार्य अविरत सुरू ठेवलेले असून अभिनय कलेवर श्रेष्ठत्व सिद्ध करीत समाज प्रबोधनाचा हा पुरस्कार प्राप्त केल्याचे गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा गजानन भारसाकळे यांनी प्रतिपादीत केले आहे दर्यापुरच्या " आई महोत्सव " या राज्य पातळीवरील कला - प्रबोधन तथा सांस्कृतिक महोत्सवाच्या साजरीकरणापासून आपल्याला बळ मिळाल्याची प्रांजळ प्रतिक्रिया यशश्री काशीकर ( रोटे ) यांनी पुरस्कार स स्विकारतांना उपस्थितांना दिली आहे . या प्रसंगा निमित्याने कार्यक्रमात संपन्न झालेल्या विद्यार्थी प्रश्नोत्तर मुलाखतीत काशीकर यांनी तुम्ही जे विचार समाजात मांडू अथवा पेरू इच्छिता त्या महापुरुषाच्या व्यक्तीमत्वाशी प्रथम आपण समरस झालेले असलो पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन या प्रसंगी उपस्थित जनसमुदाय तथा विद्यार्थी वर्गाला केले . या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबाबत काशीकर ( रोटे ) यांचे गाडगेबाबा मंडळ दर्यापूर , संत अच्युत महाराज सत्संग मंडळ परिवार वरुड तथा सर्व आप्तेष्ठ यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow